🔥 TRENDING जंतर-मंतर पर विरोध प्रदर्शन: विभिन्न म... ભરૂચમાં ડ્રાઇવિંગ સ્કૂલની કારે એક્ટિવા... बहराइच: आगामी त्योहारों के मद्देनजर डी... કોમર્સ કોલેજ, મોડાસામાં થેલેસેમીયા કેમ... Sikkim BJP chief advisor demands accou... Sikkim Aakraman Shock East Bengal, Boo...
12 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sports

श्रीमती रामप्यारीबाई चांडक विद्यालय वरुड तालुक्यातील लोणी येथील विद्यार्थी

✍️ Reporter: अंकुश सुधाकरराव कापसे 🗓 12 Oct 2026, 06:25 PM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
युवक क्रीडा संचालनालय, पुणे, व जिल्हा क्रीडा कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पावसाळी क्रीडा स्पर्धेत लोणी येथील श्रीमती रामप्यारीबाई चांडक लोणी विद्यालयाने विविध खेळ स्पर्धेत सहभाग घेऊन नेत्रादिपक यश संपादन केले. १४ आणि १७ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींचे संघ कबड्डी आणि व्हॉलीबॉल या खेळात जिल्हास्तरासाठी पात्र ठरले.

मैदानी स्पर्धेमध्ये नैतिक चारे हा विद्यार्थी १७ वर्ष वयोगटामध्ये १०० मी. धावणे मध्ये जिल्हास्तरावर प्रथम तर गोळाफेक मध्ये द्वितीय आला. यवतमाळ येथे होणाऱ्या विभागस्तर स्पर्धेकरिता तो खेळणार आहे.

या यशाबद्दल श्रीमती रामप्यारीबाई चांडक विद्यालय लोणी शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. खोडे, पर्यवेक्षक व्ही. वाय. चिमोटे, क्रीडा शिक्षक संजय बोहरुपी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
📲Get App