🔥 TRENDING ‘Muddhu Sose’ Artists Visit Annapoorne... Yuvraj Singh calls out truth in Cristi... KL Rahul stars in new ‘Ro-Co’ comedy a... ગણદેવી તાલુકા અનાવિલ મંડળ દ્વારા નવરાત... ખંભાળિયામાં રખડતા ઢોરનો ત્રાસ: વાહનચાલ... લિંબાયત પોલીસે ૩૫ પેટી અંગ્રેજી દારૂ સ...
09 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

शिरूरमध्ये पत्रकार संघाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणगौरव संपन्न

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 09 Oct 2026, 07:24 PM 👁 15
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सिनेअभिनेते सुनील गोडबोले यांना 'उत्कृष्ट सिने रत्न' तर तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे रामदास राऊत यांना 'उत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्काराने सन्मानित

शिरूरमध्ये पत्रकार संघाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणगौरव संपन्न

शिरूर (दि. ९ ऑक्टोबर):
महाराष्ट्र राज्य मराठा पत्रकार संघ (शिरूर तालुका) यांच्या वतीने आज शिरूर येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

प्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ धाडीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष नीतीश गादिया आणि सिनेअभिनेते सुनील गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सिनेअभिनेते सुनील गोडबोले यांना 'उत्कृष्ट सिने रत्न' तर तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे रामदास राऊत यांना 'उत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक
उपाध्यक्ष अर्जुन बडे यांनी, सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले, तर आभार अध्यक्ष संतोष शिंदे यांनी मानले. या वेळी श्री.विठ्ठल घावटे माजी सरपंच प्रथम लोकायुक्त, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत श्री.स्वप्नील ढमढेरे यांच्यासह पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App