शेळगाव बॅरेजजवळ नदीपात्रात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला; दोन दिवसांपासून सुरू होते शोधकार्य.....
विभागीय प्रतिनिधी
शेळगाव (ता. यावल) : शेळगाव बॅरेज परिसरातील नदीपात्रात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव राजू शहाजी नेरकर (वय ४५) असे असून, ते मूळचे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी होते. सध्या ते जळगाव एमआयडीसी परिसरात वास्तव्यास होते. एका नामांकित कृषी कंपनीत ते मार्केटिंग मॅनेजर पदावर कार्यरत होते, अशी माहिती मिळाली आहे.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी बॅरेजवरील पुलावरून नातेवाईकांशी मोबाईलवर संपर्क साधला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.
दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आज सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, भुसावळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला दुपारी २ वाजता या घटनेची माहिती मिळताच पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नरवीरसिंग रावल आणि यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत भुसावळ अग्निशमन दलाचे गजेंद्र जावळे, हितेश रायपुरकर, गौरव सपकाळे, गजू सावकारे, समाधान पाटील, यावल पोलीस ठाण्याचे उमेश महाजन व त्यांचे सहकारी, तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे शेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे