🔥 TRENDING बेतिया नगर निगम प्रशासन ने शहरी क्षेत्... અંબાજીમાં Talod મહાદેવ ટ્રસ્ટ દ્વારા ભ... Bihar Becomes First Indian State to La... बीड़ में डॉ. बी.आर. अंबेडकर भवन के निर... Accused in Manji Sahib Shooting Dies i... Police Launch Operation CASO House‑to‑...
03 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Jobs & Career

शहादा येथे पेन्शन अदालत चे आयोजन

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 03 Nov 2026, 02:24 PM 👁 65
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शहादा येथे पेन्शन अदालत चे आयोजन

शहादा जिल्हा नंदुरबार येथे येथे पेन्शन अदालत. शहादा दिनांक 3 11 26 रोजी दुपारी 11 वाजता पंचायत समिती येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयक अदालतीचे आयोजन करण्यात आले शहादा तालुका सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाशी म्हणजेच पेन्शन संबंधित अडचणी व तक्रारी सोडवण्यासाठी पेन्शन आदालत चे आयोजन केले या पेन्शन अदालत मध्ये तक्रारीचे प्रकार व त्यांचे निराकरण केले जाते पेन्शन मिळण्यास होणारा विलंब.उपदान किंवा महागाई भत्त्याची थकबाकी न मिळणे. पेन्शन खात्यात नाव किंवा जन्मतारीख यातील दुरुस्ती.कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करण्यातील अडचणी. या सगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नुकतेच पेन्शन अदालत चे आयोजन करण्यात आले शहादा तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री शरद भाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ह्या पेन्शन अदालतीचे नियोजन करण्यात आले यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी आणि पेन्शन धारक समोरासमोर बसून तक्रारीवर चर्चा करण्यात आली जेणेकरून प्रकरणांच्या तात्काळ निपटारा करता येईल ज्या कर्मचाऱ्यांचे पेन्शनचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांनी त्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांचे पंचायत समितीकडे सादर करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले होते कर्मचाऱ्यांच्या गट विमा विषय विचार करण्यात आला तसेच पेन्शन दर महा पाच तारखेच्या आत जमा करण्यात यावे 27 निवड श्रेणी बाबत कार्यवाही करण्यात येईल या उपक्रमामुळे अनेक वृद्ध सेवानिवृत्तांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे न मारता न्याय मिळण्यास मदत होते
📲Get App