Crime
सावध रहा! डिजिटल व्यवहारात सायबर फसवणुकीपासून बचाव करण्याचे मार्ग
मोबाईल बँकिंग, UPI पेमेंट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे नागरिकांना सायबर गुन्ह्यांचा धोका वाढला आहे. या लेखात फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय दिले आहेत.
मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरूक होणे काळाची गरज आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल बँकिंग, UPI पेमेंट, सोशल मीडिया, ऑनलाइन खरेदी आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, परंतु याच डिजिटल सुविधांचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
बनावट बँक कॉल, KYC अपडेटच्या नावाखाली पाठवलेले संदेश, अनोळखी लिंक, बनावट नोकरीच्या जाहिराती, सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग, OTP मागून होणारी फसवणूक तसेच डिजिटल अटक (Digital Arrest) अशा विविध पद्धतींनी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. या सर्व पद्धतींमध्ये अनोळखी व्यक्तींना OTP, UPI PIN किंवा पासवर्ड सांगणे, अनोळखी लिंकवर क्लिक करणे, बँक किंवा सरकारी अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे, स्क्रीन शेअरिंग किंवा रिमोट ॲक्सेस ॲप अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून इन्स्टॉल करणे यांचा समावेश होतो.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी मजबूत पासवर्ड आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरावे, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना खात्री करूनच पैसे पाठवावे, आणि डिजिटल अटक ही कायदेशीर अटकेची अधिकृत प्रक्रिया नाही, अशा नावाने धमकावणाऱ्यांपासून सावध राहावे. तसेच सोशल मीडिया अकाउंटसाठी सुरक्षितता वाढवण्यासाठी नियमितपणे पासवर्ड बदलणे आणि शंका असल्यास त्वरित बदलणे आवश्यक आहे.
फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा आणि अधिकृत सायबर क्राइम पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी. नागरिकांनी स्वतः जागरूक राहण्याबरोबरच आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि परिसरातील इतर नागरिकांनाही डिजिटल फसवणुकीच्या पद्धतींबाबत माहिती द्यावी. एक छोटीशी चूक आर्थिक नुकसान घडवू शकते; मात्र थोडीशी सतर्कता मोठी फसवणूक टाळू शकते.