🔥 TRENDING Meghalaya Education Mission Distribute... ବାଲି ଚୋରାଚାଲାଣ କରୁଥିବା ହାଇୱା ଧକ୍କାରେ ବ... Nagas receive 39 ancestral remains rep... Meghalaya CM Conrad Sangma Hands Over... 16th Foundation Day of Thoubal Distric... 42 वर्षीय मो सरफराज को पत्नी पर मारपीट...
28 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सावंगा जहांगिर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या केली

✍️ Reporter: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 28 Nov 2026, 09:14 PM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सावंगा जहांगिर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

'' सावंगा जहांगिर येथे युवकाची आत्महत्या;

*वाशिम, दि. २८ नोव्हेंबर :*

जिल्हा प्रतिनिधी:वाशिम जिल्ह्यातील सावंगा जहांगिर येथे एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर घटना नेमकी कधी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली की पहाटेच्या सुमारास घडली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी युवकाच्या नातेवाईकांकडे याबाबत सखोल विचारणा केली आहे.

घटना घडली त्यावेळी युवकाची आई घरी नव्हती, अशी माहिती जवळच्या नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, सदर युवक हा चांगल्या स्वभावाचा व मनमिळाऊ होता, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.

*या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर सर्व घटनेचा पंचनामा करण्यात आला.* पंचनाम्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली असून, पुढील तपास *पोलीस निरीक्षक जगन्नाथ कोंडुजी घाटे साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही .
📲Get App