🔥 TRENDING 500 Haryana Activists Join Rahul Gandh... First Gender-Affirming Bottom Surgery... Former Rajasthan MLA Atar Singh Bhadan... Former BJP MLA Atar Singh Bhadana Murd... Gayanes ka Istifa ભરૂચ RTI એક્ટિવિસ્ટ ટીમે રાજ્યપાલને રજ...
12 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

साक्री तालुका काँग्रेसची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी १ लाखांच्या मदतीची मागणी

✍️ Reporter: Khushal Vasant Wadekar 🗓 12 Oct 2026, 05:12 PM 👁 6
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

साक्री तालुका काँग्रेसने पिंपळनेर येथे अपर तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. यासोबतच २४ तास वीजपुरवठा, जीएसटी रद्द करणे आणि पीककर्ज माफ करणे यांसारख्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.

पिंपळनेर येथे साक्री तालुका काँग्रेसच्या वतीने दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने प्रतिहेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपळनेर अपर तहसीलदार कार्यालयात अधिकारी पेंढारकर यांना निवेदन सादर केले.

माजी खासदार बापूसाहेब चौरे आणि तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची, २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्याची, खते व बियाण्यांवरील जीएसटी रद्द करण्याची, पीककर्ज माफ करण्याची आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.

शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन नुकसानभरपाईसह इतर मागण्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदन देताना माजी सभापती शांताराम कुवर, गणपत चौरे, सचिन सोनवणे, दीपक साळुंखे, महेश कोरडे, विश्वास बागुल, ओंकार राऊत, काका सर बिरारीस, सागर देसले, धुडकू भारुडे, गणेश गावित, संदीप भोए, युवराज चौरे, जगन्नाथ गायकवाड, उत्तम देशमुख, किसन वळवी, सुनील बहिरम आणि शिवाजी भामरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
📲Get App