🔥 TRENDING उत्तर प्रदेश: राज्यसभा की 10 सीटों पर... Central Government Sets Price Cap on C... ਦਹਿਸ਼ਤ ਮਾਰੇ ਘਰਾਂ 'ਚੋਂ ਬਾਹਰ ਭੱਜੇ ਲੋਕ સુરેન્દ્રનગર કલેકટર જી.એચ. સોલંકીની રા... DMK Stuck Over SIR Protests, Weighs Al... હરણગામ ગ્રામજનો દ્વારા સરકારી ગ્રાન્ટન...
10 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पुरुषोत्तम पुरस्कार व विचारमंथन सभा

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 10 Oct 2026, 08:48 AM 👁 18
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उच्च साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ शहादा येथे पुरुषोत्तम पुरस्कार व विचार मंथन सभा

🌟 विचार मंथन सप्ताह विशेष: 'मनोमनी संवाद मनातला जनातला'! 🌟
शहाद्यातील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ आणि श्री पी.के. आण्णा पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पुरुषोत्तम व्याख्यानमाले' अंतर्गत मुंबईच्या सुप्रसिद्ध निवेदक व व्याख्यात्या सौ. मंगलाताई खाडिलकर यांचे प्रेरणादायी व्याख्यान शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले!
सौ.खाडिलकर संवाद साधताना म्हणाल्या,
🎵 आयुष्य एक सुंदर बासुरी आहे, फक्त त्याचे सूर लावता आले पाहिजेत!
🤝 माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
💡 कवी कुसुमाग्रज, भारतरत्न लतादीदी, अमिताभ बच्चन व मनोहर पर्रीकर यांच्यासह अनेक दिग्गजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी उपस्थितांशी जिवंत संवाद साधला.
आयुष्य, संस्कार आणि माणुसकीच्या नात्यांवर प्रकाश टाकणाऱ्या या सुरेख कार्यक्रमास पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री. जगदीशभाई पाटील, सौ.जयश्रीताई दीपक पाटील, उपनगराध्यक्ष सौ.माधवीताई मकरंद पाटील, डॉ.अलकाताई कुलकर्णी, सौ.वर्षाताई जाधव, सौ.सुनीता पाटील, सौ .प्रविणा कुलकर्णी, एडवोकेट राजेश कुलकर्णी, प्राध्यापक मकरंद पाटील साहेब, डॉक्टर बी. डी. पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, प्राध्यापक दत्ता शिंदे, एडवोकेट जसराज संचेती, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App