🔥 TRENDING बागमती नदी का जलस्तर बढ़ा, माड़र पुल क... Karnataka FDA Calls Centre to Act on 2... भारी बारिश से निंबड़ी चांदावता के खेतो... MSRTC Bus Crash Near Belapur Flyover I... Two Arrested in Murder of Hindu Trader... Road Agency and Contractor Penalised O...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट;
Local

मुरबाडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट;

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 05 Sep 2026, 04:50 PM 👁 59
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट; धक्का लागून १७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, तीन जण जखमीमुरबाड:महाराष्ट्रभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. मुरबाड शहरातील रोठे आळी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान विजेचा जोरदार धक्का लागून एका १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विवेक बिडवी याचा दुर्दैवी अंत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विवेक बिडवी (वय १७ वर्षे) असे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. रोठे आळी येथील दहीहंडीच्या आयोजनस्थळी तो उत्सवाचा तयारी साठी उपस्थित होता. यावेळी कार्यक्रम अडथळा येणाऱ्या चायनीज गाडीला बाजूला करत असताना हा शॉक लागला , एका विद्युत प्रवाहित लोखंडी गाडीवर लाईट ची वायरला विवेकचा स्पर्श झाला. विजेचा झटका इतका तीव्र होता की विवेक गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले.ठाणे
मुरबाड प्रतिनिधी किशोर पवार दिनांक 5/09/2026.
📲Get App