🔥 TRENDING Assam to Export Methanol to Bangladesh... जालौन में पुलिस मुठभेड़: माता मंदिर से... NDRF Rescues Girl from 80‑ft Borewell... LPU Postpones Mid‑Term Exams, Suspends... Netanyahu Visits Abu Dhabi, Meets UAE... 23-Year-Old Missing After Saving Three...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाडकरांना गौरी-गणपतीची मोठी भेट; आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने धावणार १२ नव्या 'जिजाऊ बसेस'

मुरबाडकरांना गौरी-गणपतीची मोठी भेट; आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने धावणार १२ नव्या 'जिजाऊ बसेस'

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 12 Sep 2026, 02:33 PM 👁 74
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाडकरांना गौरी-गणपतीची मोठी भेट; आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने धावणार १२ नव्या 'जिजाऊ बसेस'मुरबाड:गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर मुरबाड तालुक्यातील जनतेसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. मुरबाडकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी करण्यासाठी १२ नव्या 'जिजाऊ बसेस' सेवेत दाखल होत आहेत. स्थानिक कार्यसम्राट आमदार मा. श्री. किसनजी कथोरे यांच्या विशेष पुढाकारातून ही हक्काची वाहतूक व्यवस्था मुरबाडकरांना सप्रेम भेट म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ नवीन जिजाऊ बसेसचे रीतसर लोकार्पण करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या बसेसच्या समस्येतून नागरिकांची सुटका करण्यासाठी आणखी ७ नवीन बसेस उद्यापर्यंत ताफ्यात दाखल होणार आहेत. एकूण १२ बसेस उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचा, नोकरदारांचा आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास आता अत्यंत सोपा आणि वेगवान होणार आहे.मुरबाडच्या विकासात भर घालणाऱ्या या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल आमदार किसनजी कथोरे, महाराष्ट्र शासन आणि परिवहन मंत्रालयाचे जनतेकडून विशेष आभार मानले जात आहेत. या नव्या बसेसमुळे यंदाचा गणेशोत्सव मुरबाडकरांसाठी खऱ्या अर्थाने प्रवासाच्या दृष्टीने चिंतामुक्त ठरणार आहे..तालुका रिपोर्टर किशोर पवार, सिटीझन रिपोर्टर
काशिनाथ देसले.
Need 24न्युज, दिनांक ११/०९/२०२६.
📲Get App