🔥 TRENDING जंडावाली क्रिकेट टूर्नामेंट का भव्य श... રાજ્યમંત્રી ત્રિકમભાઈ છાંગાએ બિરસા મું... રાજ્યમંત્રીએ પોશીના વિસ્તારમાં ત્રણ દિ... પાટણમાં SMC ની કાર્યવાહી: રૂ. 18.31 લા... काशी में ककरमत्ता पोखरी का पुनरुद्धार:... Uttarakhand High Court Dismisses Ex‑Ar...
27 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Health

मलोणीत श्रीहरी सोसायटीत घरातील पाईपलाईनचे पाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 27 Nov 2026, 04:53 PM 👁 25
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मलोणीत श्रीहरी सोसायटीत घरातील पाईपलाईनचे पाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त

मलोणीत श्रीहरी सोसायटीत घरातील पाईपलाईनचे पाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त
मलोणी, दिनाक २७- मलोणी ग्रामपंचायत हद्दीतील श्रीहरी गृहनिर्माण सोसायटीत घरातील पाईपलाईनचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे
हे पावसाचे पाणी नसून घरातून बाहेर येणाऱ्या पाईपलाईनचे पाणी आहे. सतत पाणी वाहत असल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. घरासमोर डबके साचून दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
या रस्त्यावरून शाळकरी मुले, महिला, वयोवृद्ध नागरिकांना ये-जा करताना मोठी अडचण होत आहे. दुचाकीस्वारांना घसरून पडण्याची भीती आहे.
पाईपलाईनची गळती दुरुस्त करून पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी, रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी सोसायटीतील रहिवाशांनी ग्रामपंचायत मलोणी यांच्याकडे केली आहे.
📲Get App