शिक्षा
मुली शिकल्या तरच समाज प्रगत होईल" — आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते म्हसा येथील विद्यार्थिनींना सायकल वाटप, शालेय किटचा वाटप.
नीड २४न्यूज महाराष्ट्र
" जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २२/११/२०२६
विशेष वृत्त
मुरबाड :
मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील जीवनदीप विद्यालयातील गरजू विद्यार्थिनींना आरबीएल (RBL) बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून (CSR) सायकल आणि स्कूल किटचे वाटप करण्यात आले. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते हा समाजोपयोगी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
ग्रामीण भागातील अनेक मुलींना शिक्षणासाठी दररोज लांबचा पल्ला पायी चालत गाठावा लागतो. विद्यार्थिनींची ही गैरसोय दूर करण्यासाठी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आरबीएल बँकेने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. सायकलमुळे मुलींचा शाळेचा प्रवास अधिक सोपा व सुरक्षित होणार असून, यासोबतच त्यांना स्कूल बॅग, वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य असलेले स्कूल किटही देण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार किसन कथोरे यांनी आरबीएल बँकेच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. "मुली शिकल्या तरच गाव आणि समाज प्रगत होतो, त्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी समाजातील सर्वांनीच पुढे यावे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला आरबीएल बँकेचे अधिकारी, जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड सर, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते उल्हासभाऊ बांगर, कान्होळ ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा घरत, बाळाशेठ घरत, भालचंद्र कुर्ले सर, तसेच विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सायकली मिळाल्याने विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून उपस्थितांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.