🔥 ट्रेंडिंग સુરતના ખટોદરા વિસ્તારમાં ફેક્ટરીમાં ફસ... एलपीयू छात्रों ने 15 घंटे एनएच-44 जाम... हाइडरपोरा में टाटा शोरूम में आग लगने स... हाईवे पर खड़ी BMW में आग, उपभोक्ता अदा... ધોરાજી ડેપોના સિનિયર આગેવાન અશોકસિંહ વ... सोरी की ‘मेंडाड़ी’ ने तीसरे रविवार को...
28 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मौजे भटगाव शिवारात मादी बिबट्याचा मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ

मौजे भटगाव शिवारात मादी बिबट्याचा मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ

✍️ रिपोर्टर: Vilas Patil 🗓 24 जुल. 2026, 02:32 PM 👁 110
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली

भडगाव दिनांक 22जुलै पाचोरा क्षेत्रातील भडगाव परीमंडळ अंतर्गत नियत क्षेत्र आमडदे येथील मौजे भटगाव शिवारात एका मादी बिबट्याचा मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ उडाली आहे
शेतकरी राजेंद्र रामदास पाटील यांच्या शेतालगत बांबरुड भटगाव रस्त्याच्या कडेला हा मृत बिबट आढळून आला संबंधित बिबट हा मादी असून अंदाजे दोन वर्षाचा असल्याची प्राथमिक माहिती वन विभागाने दिली आहे
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पशूधन विकास अधिकारी भडगाव यांच्या पथकाकडून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होवू न शकल्याने पुढील तपास साठी व्हिसेरा नमूने घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे
ही संपूर्ण कारवाई अमोल पाटील सहाय्यक वनसंरक्षक जळगाव राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव यांच्या उपस्थितीत सरीता पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने केली
वन विभागाकडून बिबट्याचा मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे
📲Get App