🔥 TRENDING 🛑All bank open 🛑 பள்ளி காலாண்டு விடுமுறை. BJP Worker Murdered in Bhiram, Rajasth... Gemini Horoscope: Quick Work, Friend S... LPU Students Protest Over Rape Rumor;... SOG Officer Arrested, Renewing Scrutin...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मोहाडी शाळेचे केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत यशस्वी सहभाग

मोहाडी शाळेचे केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत यशस्वी सहभाग

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 04 Sep 2026, 09:20 PM 👁 122
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नेरी केंद्रात मोहाडी शाळेचे चार विद्यार्थी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले

*मोहाडी शाळेचे केंद्र स्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत यशस्वी सहभाग*


मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा सक्षमीकरणासाठी घेण्यात आलेल्या स्पेलिंग बी स्पर्धेत नेरी केंद्रात, मोहाडी शाळेचे चार विद्यार्थ्यां तालुकास्तरिय स्पर्धेसाठी पात्र ठरले.

जिल्हा परिषद केंद्र शाळा नेरी दिगर येथे मा.केंद्रप्रमुख शुभांगीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. यात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी सहभाग घेतला.या स्पर्धेसाठी तिसरी चौथी गटामध्ये रितेश भागवत ठाकरे द्वितीय, पाचवी सहावीच्या गटात मानसी प्रदीप बोरसे द्वितीय तर सातवी आठवी इयत्ता गटात यामिनी ज्ञानेश्वर चौधरी प्रथम व हर्षा मोतीलाल बागुल द्वितीय क्रमांकाने यशस्वी झाल्या.
विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक महेंद्रकुमार हरी सावकारे तसेच सर्व शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तथा पालकांनी समाधान व्यक्त केले.
📲Get App