🔥 TRENDING कार्य சிறந்த வியாபாரிகள் விருது வழங்க வேண்டு... India, Canada Reach Fifth Negotiation... Sanjay Gupta Questions Smoking in Film... Nor'easter Hits US Northeast, Floods H... October 2026: Rare Planetary Conjuncti...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मंगळसूत्र मोबाईल चोरी करणारी टोळीवर मेहूणबारे पोलिसांची कारवाई

मंगळसूत्र मोबाईल चोरी करणारी टोळीवर मेहूणबारे पोलिसांची कारवाई

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 19 Sep 2026, 09:44 PM 👁 43
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

डिझायर कार सह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

मेहुणबारे पोलिसांची धडक कारवाई; मंगळसूत्र चोर टोळीचा पर्दाफाश, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
विलास पाटील जिल्हा प्रतिनिधी नीड 24 न्यूज
चाळीसगाव. तालुक्यातील.लांबे गाव येथील शेंद्रे बाबा यात्रेदरम्यान महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीचा मेहुणबारे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ३ पुरुष व २ महिला आरोपींना अटक केली असून, १ विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेत गर्दीचा फायदा घेत ही टोळी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरत होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पाठलाग करून संशयित MH-16-AT-6684 क्रमांकाची पांढरी डिझायर कार ताब्यात घेतली.

आरोपींच्या ताब्यातून २४.२६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ८ लाख १६ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासात आरोपींनी यापूर्वी चाळीसगाव, नांदगाव बसस्थानक तसेच नाशिक येथील सीबीएस परिसरातही अशाच प्रकारे मंगळसूत्र चोरी केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक श्रीमती सह्याद्री बिले व मेहुणबारा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी.
📲Get App