🔥 TRENDING કસ્તુરબા વિદ્યાભવનના વિદ્યાર્થીઓએ બાળ... નવસારી પોલીસે બિલીમોરાની શાળાઓમાં સાયબ... રાજકોટના ચંદ્રેશ નગર પાસે મેઈન રોડ પર... शाहजहांपुर में मंदिर परिसर में दो सेवा... बदायूं: सड़क पर टीन उतारते समय पिकअप क... હિંમતનગરમાં DGP કપ એથ્લેટિક્સ અને સાયક...
02 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लातूर च्या औसा तालुक्यातील शिवली मोड परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

✍️ Reporter: Atish balu kamble 🗓 02 Oct 2026, 10:48 AM 👁 18
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

संबंधित मृतदेह गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून त्या ठिकाणी पडून असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवली मोड येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; १५ दिवसांपासून पडून असल्याची माहिती

औसा : औसा तालुक्यातील शिवली मोड परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून त्या ठिकाणी पडून असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाल्याचे सांगण्यात येत असून, या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची ओळख पटविण्यासह पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार आहेत.

हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, संबंधित व्यक्ती कोण आहे आणि मृतदेह इतके दिवस त्या ठिकाणी कसा पडून राहिला, याबाबत पोलिसांकडून तपास केला जाणे अपेक्षित आहे.
📲Get App