🔥 TRENDING Heatwave: 35°C Temperatures Sweep Raja... Tamil Nadu Police Officer Suspended Af... Tamil Nadu Launches ‘Hi’ Chatbot for Q... Body‑Shaming Row Rocks Tamil Nadu Ahea... MP Counts Votes for 103 Panchayat Post... MP Brijesh Chowta Opens 3 TPD Material...
03 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

लांजा: शेतजमिनीच्या वादातून प्रौढावर कोयत्याने हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 03 Oct 2026, 12:04 PM 👁 20
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लांजा तालुक्यातील असोडे येथे शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५४ वर्षीय प्रौढावर कोयता, लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांजा तालुक्यातील असोडे येथे शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका प्रौढाला कोयत्याच्या पाठीमागच्या भागाने, झाडावर डोके आपटून तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात विजय सीताराम पवार (वय ५४, रा. असोडे, पोस्ट मठ, ता. लांजा) हे गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात दोन ओळखीच्या आणि चार अनोळखी अशा एकूण सहा जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय पवार हे २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास जमीन गट क्रमांक ८४ मधील आपल्या शेतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. ते शेजारी मंगेश डोंगरे यांच्या जमिनीतील आंब्याच्या कलमाखाली गप्पा मारत उभे असताना, अचानक त्या ठिकाणी सहा जण आले. त्यातील गोपीनाथ सावंत याने फिर्यादींना शेतात पाऊल न ठेवण्याची तंबी देत कोयत्याच्या पाठीमागच्या भागाने त्यांच्या पाठीवर जोरदार प्रहार केला. तसेच दावा संपायच्या आधी तुला संपवून टाकू, अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

या वेळी आरोपी निखिल डोंगरे याने हाताच्या ठोशाने मारहाण करत घरात येऊन ठोकण्याची धमकी दिली. जमावातील अनोळखी इसमांनी विजय पवार यांचे केस आणि मान पकडून त्यांना थपडांनी मारहाण केली, तर एका इसमाने त्यांचे डोके थेट सागाच्या झाडावर जोराने आपटले. इतर साथीदारांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवून शिवीगाळ केली. या अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर जखमी विजय पवार यांनी लांजा पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गोपीनाथ सावंत, निखिल डोंगरे यांच्यासह इतर चार अनोळखी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📲Get App