🔥 TRENDING Mangalore officials to draft checklist... Karnataka CM DK Shivakumar says Congre... Rajasthan BJP Announces First-Phase Pa... NDTV Provides Live Updates on Devegane... જામનગરમાં જિયો-બીપીના પેટ્રોલ-ડીઝલના ભ... Delhi Court Allows Google, WhatsApp, B...
12 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
लागवड केलेल्या भातशेतीला भेगा! ठाणे जिल्ह्यात दुष्काळाची छाया, शेतकरी हवालदील.
Agriculture

लागवड केलेल्या भातशेतीला भेगा! ठाणे जिल्ह्यात दुष्काळाची छाया, शेतकरी हवालदील.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 12 Oct 2026, 12:13 PM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
लागवड केलेल्या भातशेतीला भेगा! ठाणे जिल्ह्यात दुष्काळाची छाया, शेतकरी हवालदील

जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १२/१०/२०२६.
मुरबाड ठाणे विशेष वृत्त : यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून आणि जुलै महिन्यात पावसाचे उशिरा आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी भात-बियाणे आणि पेरणीची कामे उशिराने आटोपली. त्यामुळे पिकांचा एकूण कालावधी पुढे ढकलला गेला. आता ऐन भात पीक परिपक्व होण्याच्या आणि दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात असतानाच पावसाने दडी मारल्याने लागवड केलेल्या भातशेतीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह विशेषतः मुरबाड, कल्याण,शहापूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून ५० टक्के भात शेती धोक्यात आली आहे.
ऐन गर्भाच्या अवस्थेत पावसाचा खंड
भात पिकाच्या योग्य व उत्तम वाढीसाठी, तसेच पिकांमध्ये दाणे परिपूर्ण भरण्यासाठी किमान १० ते १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाची नितांत गरज असते. हलवे, निमगरवे आणि गरवे अशा सर्वच प्रकारच्या भात जाती सध्या महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजेच गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे खंड दिला आहे. 'एल निनो'च्या प्रभावामुळे राज्यात आणि जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमालीचे घटले असून, परतीचा पाऊसही गायब झाला आहे.
पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे भात पिके पिवळी पडून करपू लागली आहेत. पिकांमध्ये दाणे भरण्याची अवस्था परिपूर्ण न झाल्याने भाताचे प्रचंड नुकसान होऊन केवळ तूस (पळणजी ) हाती येण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एकूण लागवडीपैकी निम्म्याहून अधिक भात पीक वाया जानारच आहे.
प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन आणि उपाययोजना
या गंभीर दुष्काळी परिस्थितीची दखल कृषी विभागाने घेतली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी खचून न जाता ज्यांच्याकडे सिंचनाची किंवा पाण्याची उपलब्धता आहे, त्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर करून भात शेती जगवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा.
तसेच, कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकाऱी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनशेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या नुकसानीचे फोटो कृषी कार्यालयात जमा करावेत, जेणेकरून शासन स्तरावर नुकसानीचा दैनंदिन आढावा घेऊन पुढील मदत व पंचनाम्याची कार्यवाही वेगाने करता येईल. भविष्यात भात शेती व इतर खरीप पिकांचे नुकसान झाल्यास शासन स्तरावरून तातडीने ठोस निर्णय व अंमलबजावणी केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
📲Get App