कोयत्याने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याच्या प्रकरणात आरोपी जितेंद्र महेंद्रकर याला जामीन मंजूर!
Watch on:
▶️ YouTube
सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली; २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाकडून दिलासा
सोलापूर (प्रतिनिधी)
कोयत्याने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या जितेंद्र महेंद्रकर याला सोलापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करत २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची मुक्तता करण्याचे आदेश दिले.
सदर प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी जितेंद्र महेंद्रकर याला दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ११८(२) अन्वये अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने आरोपीची सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती.
आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. सिद्धांत सदाफुले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२) लागू करण्यासाठी फिर्यादीस झालेल्या गंभीर दुखापतीबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच संबंधित वैद्यकीय कागदपत्रे तपास यंत्रणेमार्फत न्यायालयासमोर सादर करणे आवश्यक होते. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा कागदपत्रे न्यायालयात सादर केलेली नाहीत. त्यामुळे सदर कलम लागू होण्याबाबत शंका निर्माण होत असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
तसेच, इतर आरोपींच्या अटकेच्या कारणास्तव जितेंद्र महेंद्रकर याला विनाकारण पोलीस कोठडीत ठेवणे योग्य ठरणार नाही, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद, तपासातील उपलब्ध कागदपत्रे आणि एकूण परिस्थितीचा विचार करून मा. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. मा. विनायक एम. रेडकर, न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, न्यायालय क्रमांक ३, सोलापूर यांनी दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपीस २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.
सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. संजीव सदाफुले व अॅड. सिद्धांत सदाफुले यांनी कामकाज पाहिले.