🔥 TRENDING Seven Bollywood Stars, Including Sanja... Sabeer Bhatia Recalls Wait Staff Touch... Parul Gulati Partners with Eureka Forb... Maanvi Gagroo’s Heer Sara Monologue on... Bhumi Pednekar Celebrates 3 Years of T... Kiren Rijiju Thanks Tripura Voters Aft...
07 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

कारेगाव हत्याकांडाचा पर्दाफाश; ५ आरोपी गजाआड!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 07 Oct 2026, 12:39 AM 👁 30
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मारेकऱ्यांनी मालकाऐवजी त्यांच्याकडे काम करणाऱ्या हमजा शेख यांना लक्ष्य

कारेगाव हत्याकांडाचा पर्दाफाश; ५ आरोपी गजाआड!
शिरूर : कारेगाव येथील हत्याकांडाचा रांजणगाव पोलीस आणि पुणे ग्रामीण LCB पथकाने तपास करत उलगडा केला आहे. जागेच्या वादातून मालकाच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. मात्र ओळख चुकल्याने मारेकऱ्यांनी मालकाऐवजी त्यांच्याकडे काम करणाऱ्या हमजा शेख यांना लक्ष्य केले.
हमजा शेख यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पाच आरोपींना अटक केली असून, हत्येमागील सुपारी आणि नियोजनाचा तपास पुढे सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे कारेगाव हत्याकांडाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
📲Get App