🔥 TRENDING Nagpur Records Surge in Crime: 5 Vehic... Driver Arrested Four Weeks After Deliv... Guwahati Student Found Dead; Family Ac... Delhi UT demolishes illegal structures... Crime Branch Arrests Absconding Accuse... CEA Warns Rising Global Yields and US...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जळगाव जिल्हा पोलीस दलाचा पोलीस पाटील मेळावा संपन्न

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा पोलीस पाटील मेळावा संपन्न

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 12 Sep 2026, 08:16 PM 👁 63
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 37 पोलीस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला

जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा पोलीस पाटील मेळावा व 'विश्वासाची लेन्स' स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी समर्थ लॉन्स, जळगाव येथे पोलीस पाटील मेळावा व ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र व Reels स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

ग्रामीण भागात पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणे व त्यांना नवीन कायदे, कायदा व सुव्यवस्था, कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी ‘पोलीस पाटील मार्गदर्शक पुस्तिका’ चे अनावरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजय सावकारे, आमदार मा. श्री. सुरेश भोळे, आमदार मा. श्री. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३७ पोलीस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला
📲Get App