🔥 TRENDING Defence Minister Rajnath Singh: 'Decis... Saif Ali Khan Recounts Rajasthan Road... > *खबर जयपुर ग्रामीण के शाहपुरा विधानस... RR and LSG Explore Trade Deal Involvin... Four Arrested in Ludhiana Over Turtle... एक आमदार काय करू शकतो? याचं उत्तम उदाह...
13 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

हुंदका एक आईचा’ वेब सिरीजमधून सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश; रामदास राऊत यांच्या कलाकृतीचे कौतुक!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 13 Nov 2026, 06:51 PM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वेब सिरीजमध्ये बालहत्येला विरोध, मोबाईलचा वाढता अतिरेक, कोणावर किती विश्वास ठेवावा, नात्यांमधील समजूतदारपणा आणि कौटुंबिक संवाद

‘हुंदका एक आईचा’ वेब सिरीजमधून सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश; रामदास राऊत यांच्या कलाकृतीचे कौतुक!

पुणे प्रतिनिधी |13 नोव्हेंबर 2026

तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘हुंदका एक आईचा’ या मराठी वेब सिरीजमधून लेखक, निर्माते व दिग्दर्शक श्री. रामदास राऊत यांनी मनोरंजनासोबतच प्रभावी सामाजिक प्रबोधन केले आहे.

या वेब सिरीजमध्ये बालहत्येला विरोध, मोबाईलचा वाढता अतिरेक, कोणावर किती विश्वास ठेवावा, नात्यांमधील समजूतदारपणा आणि कौटुंबिक संवाद यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य करण्यात आले आहे.

कुटुंबातील प्रेम, वात्सल्य, एकता, मुलांचे योग्य संगोपन, गावाची सामाजिक जडणघडण आणि परस्पर सहकार्य यांचे महत्त्वही या कथानकातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

मनोरंजनातून समाजाला विचार करायला लावणारी ही एक कौतुकास्पद कलाकृती असून श्री. रामदास राऊत यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक होत आहे.

तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या ‘हुंदका एक आईचा’ या वेब सिरीजला प्रेक्षकांनी नक्की पाहावे, लाईक व सबस्क्राईब करून मराठी कलाविश्वाला प्रोत्साहन द्यावे!
📲Get App