🔥 TRENDING UP Man Arrested in Delhi After Murderi... Bihar's Chhath Puja 2026 Preparations... Iran's Defence Official Reaches Moscow... Chhath Puja: A Cultural Anchor for Bih... Bhopal readies for 2027 Swachh Surveks... ਜਲੰਧਰ-ਅਮ੍ਰਿਤਸਰ ਹਾਈਵੇ 'ਤੇ ਰਾਤ ਨੂੰ ਕੋਈ ਵ...
13 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

सिनेमा आणि नाट्यगृहाअभावी मुरबाडकर मनोरंजनापासून वंचित; प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात — रमेश देसले यांची मागणी

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 13 Nov 2026, 06:42 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक १४/११/२०२६.
मुरबाड (प्रतिनिधी) | नीड २४ न्यूज महाराष्ट्र:
कल्याण शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेला आणि झपाट्याने विकसित होणारा मुरबाड तालुका आजही मनोरंजनाच्या मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. संपूर्ण तालुक्यात एकही सिनेमा गृह किंवा सुसज्ज नाट्यगृह उपलब्ध नसल्याने, येथील हजारो सिने आणि नाट्य रसिक मनोरंजनाचा आस्वाद घेण्यापासून वंचित राहत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश देसले यांनी केली आहे.
कल्याण-ठाण्याची वारी करावी लागल्याने रसिकांमध्ये नाराजी
मुरबाड शहर आणि ग्रामीण भागाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षण, उद्योग आणि नोकरीच्या निमित्ताने तालुक्यातील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, कुटुंबासह विरंगुळ्याचे दोन क्षण घालवण्यासाठी किंवा चांगला मराठी-हिंदी चित्रपट आणि नाटक पाहण्यासाठी मुरबाडमध्ये कोणतीही व्यवस्था नाही. परिणामी, येथील रसिकांना नाईलाजाने कल्याण, डोंबिवली किंवा ठाणे शहराची वाट धरावी लागते.
वेळ आणि पैशांचा अपव्यय
कल्याण किंवा ठाण्याला जाऊन चित्रपट किंवा नाटक पाहणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी खर्चिक आणि वेळखाऊ ठरत आहे. प्रवासाचा ताण आणि आर्थिक भुर्दंड यामुळे अनेक कलाप्रेमी इच्छा असूनही नाट्य-चित्रपट कलेचा आस्वाद घेऊ शकत नाहीत. याचा फटका स्थानिक सांस्कृतिक चळवळीलाही बसत असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज
"मुरबाड तालुक्यातील जनतेची ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कल्याणसारख्या मोठ्या शहरापासून इतक्या जवळ असूनही मुरबाडमध्ये एकही नाट्यगृह किंवा सिनेमा गृह नसावे, ही खेदाची बाब आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी प्रेक्षकांची ही गरज ओळखून लवकरात लवकर यावर ठोस निर्णय घ्यावा," असे मत रमेश देसले यांनी व्यक्त केले आहे.
आता तरी प्रशासन या प्रलंबित मागणीची दखल घेऊन मुरबाडकरांना हक्काचे मनोरंजन केंद्र उपलब्ध करून देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
📲Get App