घरो घरी नळ तर दिलेत पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली सरकारी विहिरीला पाणी भरपूर प्रमाणात आहे पण प्रशासनाचे दुर्लक्ष .
वाशिम जिल्हा प्रतिनिधी:सदरहू विहीर जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत रुपये एक कोटी अंदाजे संपूर्ण काम विहीर खोदणे विहीर बांधणे त्यात पंप टाकणे विहिरीपासून गावापर्यंत पाईपलाईन करणे व गावातील टाकी पूर्णपणे बांधलेले असून सदरहू विहिरीपासून टाकीपर्यंत पूर्ण काम चेक केले असून एक वेळेस टाकीमध्ये पाणीपुरवठा पाणी सोडले असून गावामध्ये पूर्णपणे पाईपलाईन खोदून प्रत्येक कुटुंबाला कुटुंबाच्या घरापर्यंत घरापर्यंत पाणी घेण्यासाठी नळ दिलेला आहे तरी दोन वर्षापासून गावात जलजीवन मिशन अंतर्गत या योजनेचे पाणी आतापर्यंत गावात सोडले नाही गावातील विहिरी पूर्णपणे कोरड्या झाल्या असून या योजनेचे पाणी गावाला मिळणे अत्यंत आवश्यक आहे सदर व सर्व महिला दोन दोन किलोमीटर अंतरावर डोक्यावर पाणी घेऊन येत आहेत तरी प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर मिशनची पाणी गावात सोडावे. अन्यथा एक डिसेंबर पासून जिल्हा परिषद समोर सर्व गावकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला.