🔥 ट्रेंडिंग राजापुर जलालपुर के उच्च माध्यमिक विद्य... स्वच्छ हावड़ा — स्वस्थ हावड़ा 🌿 ದೇವದುರ್ಗ ಕುಡುಕರ ಅಡ್ಡೆಯಾದ ಪತ್ರಕರ್ತರ ಭವನ... ರಾಯಗಡ: ದಿವ್ಯಗಾರ್ ಬೀಚ್‌ನಲ್ಲಿ ಈಜಲು ತೆರಳಿ... ପୋଖରୀରେ ବୁଡ଼ି ଯୁବକ ମୃତ सुपरनोवा बिल्डिंग से कूदकर व्यक्ति ने...
04 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जीवनशैली

एसटीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेतील पास आता ऑनलाईन मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना घरबसल्या ऑनलाईन पास मिळवता येणार आहे.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 04 अक्टू. 2026, 12:10 AM 👁 17
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
दिनांक ४/१०/२०२६.
मुरबाड : एसटीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेतील पास आता ऑनलाईन मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना घरबसल्या ऑनलाईन पास मिळवता येणार आहे.

एसटीच्या या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या ४ व ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन पास काढताना प्रवाशांना आवश्यक माहिती भरल्यानंतर नियमानुसार पास उपलब्ध होणार आहे. प्रवाशाला प्राप्त झालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवता येणार आहे.

क्यूआर कोड स्कॅन करून होणार तपासणी
ऑनलाईन पद्धतीने मिळालेल्या पासवर क्यूआर कोड देण्यात येणार आहे. प्रवासाच्या वेळी वाहकाकडील ईटीआयएम मशिनद्वारे हा कोड स्कॅन केला जाईल. कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, पासची वैधता व इतर आवश्यक माहिती ईटीआयएम मशिनवर प्रदर्शित होणार आहे. तसेच, प्रवाशाने दाखविलेल्या ओळखपत्राचीही पडताळणी करण्यात येणार असून त्यानंतरच संबंधित प्रवाशाला प्रवासाची परवानगी दिली जाईल.
📲Get App