🔥 TRENDING Indore Head Constable Sanjay Dies Afte... Diwali Shift to LED Lights Hits Clay L... Gujarat Police Arrest Three Uttar Prad... रायथाना में डिब्बा कारखाने में अचानक ल... Zalod ଧନତେରାସରେ ଗ୍ରାହକଙ୍କୁ ବଡ଼ ଆଶ୍ୱସ୍ତି; ହଠା...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

एसटी प्रवासात महिलांना 'एनसीएमसी' (NCMC) कार्ड सक्तीतून मोठा दिलासा; ३१ डिसेंबरपर्यंत अट शिथिल

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 06 Nov 2026, 03:14 PM 👁 25
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४न्युज महाराष्ट्र
विशेष वृत्त
दिनांक: ६/११/२०२६
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुरबाड ठाणे :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. एसटी प्रवासात सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी आवश्यक असणारी 'एनसीएमसी' (NCMC) कार्डची अनिवार्य अट आगामी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील महिला प्रवाशांची गैरसोय टळणार
एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट प्राप्त करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले होते. मात्र, महिला लाभार्थ्यांची संख्या प्रचंड असतानाही आतापर्यंत केवळ १.१० कोटी कार्ड्सची नोंदणी आणि वितरण झाले आहे. विशेषतः गाव-खेड्यातील महिलांना या योजनेची पुरेशी माहिती नसल्याने अनेक महिलांची नोंदणी अद्याप झालेली नाही, ही बाब महामंडळाच्या निदर्शनास आली होती. या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांना सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आता ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत सवलत
नवीन परिपत्रकानुसार, महिला प्रवाशांना सवलतीच्या तिकिटासाठी लागू केलेली एनसीएमसी कार्डची अट ७ नोव्हेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी शिथिल करण्यात आली आहे. या वाढीव कालावधीत सर्व महिला लाभार्थ्यांनी आपले एनसीएमसी कार्ड नोंदवून घ्यावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
मुरबाड बस स्थानकावर कार्ड वितरण व्यवस्था सज्ज
महिला प्रवाशांच्या सोयीसाठी मुरबाड बस स्थानकावर महामंडळातर्फे अधिकृत एजंटची नेमणूक करण्यात आली आहे. कार्ड बनवणे व त्याचे वाटप जलद गतीने व्हावे यासाठी आगार व्यवस्थापकांनी या एजंटला सकाळी ९:०० वाजल्यापासून ते अगदी संध्याकाळी उशिरापर्यंत काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही वेळी स्थानकावर जाऊन कार्ड काढता येणार आहे. याशिवाय, कार्ड बनवून देण्यासाठी पवार (खाजगी एजंट) हे देखील कार्यरत असून, नागरिक अधिक माहिती किंवा मदतीसाठी त्यांच्या ७३५०३५०१२२ (7350350122) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
ग्रामपंचायत स्तरावर भरणार विशेष शिबिरे: मुरबाड आगार व्यवस्थापक मुसळे
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत १०० टक्के महिला प्रवाशांपर्यंत हे कार्ड पोहोचवण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. यासाठी थेट ग्रामपंचायत स्तरावर जाऊन विशेष नोंदणी व वितरण शिबिरे आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या संदर्भातील माहिती देताना मुरबाड आगाराचे व्यवस्थापक श्री. मुसळे साहेब यांनी सांगितले की, "वरिष्ठांच्या आदेशानुसार मुरबाड परिसरातील गाव-खेड्यांमध्ये ग्रामीण महिलांसाठी विशेष शिबिरे राबवली जातील. या मोहिमेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग घेतला जाईल, जेणेकरून ३१ डिसेंबरपर्यंत तालुक्यातील १०० टक्के महिला प्रवाशांची एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण होईल."
महामंडळाच्या या निर्णयामुळे ऐन प्रवासाच्या काळात ग्रामीण भागातील हजारो महिला प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
📲Get App