🔥 ट्रेंडिंग कौशाम्बी में ऑपरेशन चक्रव्यूह के तहत प... ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ರೈತರ ಮಕ್ಕಳ ಮದುವೆ ಸಮಸ್ಯೆ... ભરૂચના ઝઘડિયા તાલુકામાં 12 વર્ષીય બાળક... विधायक श्री छोटेलाल वर्मा के परिवार को... एंड्रू प्रांत में 264 नई स्वास्थ्य क्ल... सीएम नायडू ने अमरावती में 500 करोड़ का...
04 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली - २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, घातपाताचा संशय....!!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 04 अक्टू. 2026, 07:40 PM 👁 15
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तिसगाव-वडगाव रस्त्यावरील संविधान चौकात काल रात्री भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात मकरंद संजय जाधव (वय २२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काल रात्री मकरंद जाधव दुचाकीवरून प्रवास करत असताना त्याचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, धडकेनंतर त्याच्या दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. एवढेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला असलेली सिमेंटची सुरक्षा भिंतही या जोरदार धडकेने तुटून खाली कोसळली.

अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मकरंदला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुखापत अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
📲Get App