🔥 ट्रेंडिंग NewsUpdate समंदर का नया सिकंदर - राफेल... સાબરકાંઠા જિલ્લામાં હિંમતનગરમાં સ્વદેશ... ಚುನಾವಣಾ ನಿಯಮಗಳನ್ನು ಉಲ್ಲಂಘನೆ: ಜಿಲ್ಲಾಧಿಕ... 31 अक्टूबर 2026, शनिवार का दैनिक राशिफ... एम्स पटना में विश्व स्ट्रोक दिवस स्पार... पुणे फ्लैट में लंदन से गुप्त वापसी करन...
31 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

चर्मकार विकास संघाच्या लढ्यास यश ! लेदरपार्क साठी राखीव देवनार मुंबई येथील अतिक्रमण केलेला २ एकर भूखंड मोकळा !

✍️ रिपोर्टर: Yallappa Rayagond Ragate 🗓 31 अक्टू. 2026, 09:16 AM 👁 25
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
चर्मकार विकास संघाच्या लढ्यास यश !
लेदरपार्क साठी राखीव देवनार मुंबई येथील अतिक्रमण केलेला २ एकर भूखंड मोकळा !
देवनार गोवंडी मुंबई येथील लेदर पार्क साठी राखीव दोन एकर असलेला भूखंड गावगुंडांनी मागील अनेक वर्षापासून ताबा मारून बळकवला होता.
या भूखंडाच्या सुरक्षेच्या करिता लीडकामने दुर्लक्ष केले होते.
परंतु चर्मकार विकास संघ यांच्या माध्यमातून सदर भूखंड खाली करण्यासंदर्भात मागील दोन वर्षापासून लढा उभारण्यात आला होता.
आज प्रशासनाने पोलीस स्वरक्षणासह कारवाई करत सदर भूखंड खाली करण्यासाठी कडक कारवाई करून भूखंडावरील मोकळा करून साफसफाई करण्याचे काम सुरू केले आहे.
सदर भूखंड खाली करून त्यास भक्कम कंपाऊंड आणि कायमस्वरूपी देखरेखी साठी कमांडो ठेवण्यात यावेत व सदर जागेत लेदर पार्कचे काम ताबडतोब सुरू करण्यात यावे अशी मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात येणार आहे.
लीडकॉम ने सदर भूखंडाचा आजपर्यंत महानगरपालिकेला टॅक्सच्या रूपात जवळपास दोन कोटी रुपये दिलेले आहेत हा भूखंड सांभाळायची जबाबदारी पूर्णता लीडकॉम होती परंतु लीडकांच्या निष्क्रिय कामचुकार अधिकारी यांनी याकडे हेतूपुरस्कार दुर्लक्ष केले आहे यासाठी आम्ही अनेकदा माननीय मुख्यमंत्री माननीय समाज कल्याण मंत्री माननीय सेक्रेटरी यांच्यासह लीडकॉम यांना निवेदन देवून चर्चा केली आहे.
परंतु शेवटी चर्मकार विकास संघाला या भूखंडा ठिकाणी आंदोलन करून तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा भूखंड वाचवण्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली म्हणून आज चर्मकार समाजाच्या विकासाचा भूखंड वाचवण्यात यश आले आहे.
चर्मकार विकास संघाच्या सर्व सहभागी पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार
प्रदेशाध्यक्ष संजय खामकर
सुभाष मराठे
मुंबई प्रदेश अध्यक्ष
📲Get App