🔥 TRENDING ఉమ్మడి (ప.గో.) జిల్లాలో అర్నబ్ తుఫాన్... తణుకు పట్టణంలో ఈదురు గాలి, భారీ వర్షం... ભાવનગર એ.સી.બી.માં લાંચની છટકાની તપાસ:... తణుకు జెడ్పీ హైస్కూల్‌లో తుఫాను పునరావ... Ram Kripal Yadav Raises Concerns Over... Indian Museum Tops World's 100 Best Li...
28 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोर तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम असून, पाणीटंचाईच्या झळा गडद होत चालल्या आहेत.. तालुक्यातील नदी, ओढे,  नाले, विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत..पाण्याने तळ गाठला

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 28 Oct 2026, 02:24 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर, पुणे

भोर तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम असून, पाणीटंचाईच्या झळा गडद होत चालल्या आहेत..

तालुक्यातील नदी, ओढे,  नाले, विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत..पाण्याने तळ गाठला आहे.

नीरा खोऱ्यातील धरणे शंभर टक्के भरले आहेत..

खरिपातील महत्त्वाची बहुतांशी हेक्टरवरील पिके पाण्यावाचून जळून गेली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, काहीशा प्रमाणात राहिलेले उभे भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, त्यासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकरी धोम-बलकवडी, नीरा-देवघरच्या कालव्यांच्या पाण्याची प्रतीक्षा करू लागला असून, शेतकरी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी करू लागले आहेत.

काही गावांमध्ये विहिरींनी तळ घाटल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे.. तर काही शेतकऱ्यांची उभे भात पीक जोमात असल्याने त्याला पाण्याची गरज आहे.. नीरा देवघर धरणांच्या कालव्यांना जलसंपदा विभागाकडून आवर्तन सोडले, तर उर्वरित भात शेतीला पाण्याचा उपयोग होऊन शेतकऱ्यांना कसेबसे तुटपुंजे उत्पन्न मिळणार असल्याचे चित्र आहे. मात्र, कालव्यांना पाणी सोडले गेले नाही.तर काहीशा प्रमाणात बचावलेली भात पिके वाया जाणार आहेत.


सद्यःस्थितीला ओढे, नाले, कालवे कोरडेठाक पडले असून, विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. जलसंपदा विभागाने दोन्ही धरणांच्या कालव्यांना लवकरात लवकर आवर्तन सोडावे.

कालव्याच्या पाण्याचा उपयोग शेती पिकांना होईल तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन एक आवर्तन सोडावे, अशी मागणी नागरिकांकडून होतं आहे..
📲Get App