🔥 ट्रेंडिंग छत्रपती संभाजीनगरमध्ये पिस्तुलांसह जीव... क्या सरकार नहीं कर रही फूड एजेंसीयों क... भारत का निजी क्षेत्र का गतिविधि सूचकां... ईकॉम टाइम्स ने कहा, दिल्ली को व्यापार... इंडिया ब्लॉक ने यूपी चुनाव के लिए सीट‑... फ्रंटलाइन पत्रिका ने चुनाव आयोग पर सवा...
25 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

भगतनगर ते मुलचेरा–अहेरी मार्गाची दुरवस्था; नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास

✍️ रिपोर्टर: DR:PINTU PAUL 🗓 25 अक्टू. 2026, 04:39 AM 👁 41
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भगतनगर ते मुलचेरा–अहेरी मार्गाची दुरवस्था; नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास

भगतनगर ते मुलचेरा–अहेरी मार्गाची दुरवस्था; नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास

मुलचेरा, जि. गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या भगतनगर गावापासून मुलचेरा–अहेरी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने तसेच इतर वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याची खराब अवस्था असल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून अपघात होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करताना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील रस्ते हे गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे साधन असताना भगतनगर परिसरातील या रस्त्याची दुरवस्था नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाने त्वरित दखल घेऊन भगतनगर ते मुलचेरा–अहेरी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
📲Get App