🔥 TRENDING Ambala Construction Site Collapse Leav... Kharif Acreage Surpasses Five‑Year Ave... Rumor of Student Rape Sparks Protests... 3-Day Bank Strike Called Off After Lat... India’s Diplomatic Dilemma: Navigating... Pakistan reaches Asian Games cricket s...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
भडगाव तालुक्यातील आचंळगाव येथे डेगू प्रतिरोध जनजागृती

भडगाव तालुक्यातील आचंळगाव येथे डेगू प्रतिरोध जनजागृती

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 23 Jul 2026, 05:32 PM 👁 96
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर

*आंचळगाव येथे डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त जनजागृती*

भडगाव-महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यात जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून साजरा करून नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराविषयी जनजागृती केली जाते.डॉ.विवेक खतगावकर (सहाय्यक संचालक हिवताप,नाशिक) जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जळगाव हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ही मोहीम सुरू आहे. भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.समाधान वाघ व पिंपरखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिक भोसले यांच्या सूचनेनुसार पिंपरखेड येथील आरोग्य सेवक राजेंद्र पवार यांनी आंचळगाव येथील कृष्णराव पाटील माध्यमिक विद्यालयात मोहिमेचे आयोजन केले.कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पिंपरखेड येथील आरोग्य निरीक्षक संजय सोनार कळवाडीकर यांनी सांगितले की डेंग्यूला रोखायचे असेल तर डास उत्पत्ती रोखणे गरजेचे आहे.त्यासाठी प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.त्या दिवशी आपल्या घरातील सर्व भांडे उपसून, घासून-पुसून कोरडे करून भरावीत.तसेच पाण्याच्या टाक्यांवर घट्ट झाकण ठेवावे.या दोन गोष्टींचे पालन केल्यास डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत होईल.तरी वरील सूचनांचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन सोनार यांनी सदर प्रसंगी केले.कार्यक्रम प्रसंगी आरोग्य पथकाचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक कृष्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव उज्वल राठोड,आरोग्य सेवक राजेंद्र पवार,अभिराज चव्हाण,धनराज बोरसे,महेंद्र पाटील,पुरुषोत्तम देवरे, भगवान जायभावे,सुदर्शन पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बाविस्कर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कृष्णा पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
📲Get App