🔥 TRENDING Assam to Export Methanol to Bangladesh... जालौन में पुलिस मुठभेड़: माता मंदिर से... NDRF Rescues Girl from 80‑ft Borewell... LPU Postpones Mid‑Term Exams, Suspends... Netanyahu Visits Abu Dhabi, Meets UAE... 23-Year-Old Missing After Saving Three...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
आमदार ॲड.अमोलदादा पाटील व जिल्हा शल्यचिकित्सक स्वप्नीलजी सांगळे यांच्याकडून आढावा

आमदार ॲड.अमोलदादा पाटील व जिल्हा शल्यचिकित्सक स्वप्नीलजी सांगळे यांच्याकडून आढावा

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 08 Aug 2026, 08:52 PM 👁 78
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

एरंडोल ग्रामीण रुग्णालय व पारोळा कुटीर रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट;

आमदार ॲड.अमोलदादा पाटील व जिल्हा शल्यचिकित्सक स्वप्नीलजी सांगळे यांच्याकडून आढावा

एरंडोल ग्रामीण रुग्णालय व पारोळा कुटीर रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट; नागरिकांच्या तक्रारींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना

एरंडोल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील व जळगाव जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक मा. स्वप्नीलजी सांगळे यांनी आज ग्रामीण रुग्णालय, एरंडोल व कुटीर रुग्णालय, पारोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.

दरम्यानच्या काळात या दोन्ही रुग्णालयांबाबत नागरिकांकडून काही तक्रारी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये आणि रुग्णांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, या अनुषंगाने आजच्या भेटीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचारी यांची उपस्थिती, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, औषधांचा उपलब्ध साठा, प्रयोगशाळा व विविध तपासणी सुविधा, आपत्कालीन सेवा, प्रसूती विभाग, रुग्णालयातील बेडची उपलब्धता तसेच आवश्यक वैद्यकीय उपकरणांची कार्यस्थिती याबाबत माहिती घेण्यात आली.

तसेच रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच्या सुविधा, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, शौचालये आणि इतर मूलभूत सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी व रुग्णालयातील सेवांबाबतचा अनुभव जाणून घेण्यात आला.
.

तसेच डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपलब्ध राहणे, आपत्कालीन सेवा प्रभावीपणे सुरू ठेवणे, औषधे व आवश्यक साहित्याचा पुरेसा साठा ठेवणे आणि उपलब्ध वैद्यकीय उपकरणे नियमितपणे कार्यरत ठेवणे, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आले

आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी सांगितले की, “सर्वसामान्य नागरिकांसाठी शासकीय रुग्णालय हे मोठे आधारस्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला गैरसोय किंवा अडचण निर्माण होऊ नये. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित तक्रारी पुन्हा माझ्यापर्यंत येऊ नयेत, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे.”

एरंडोल व पारोळा येथील रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणीच दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या समन्वयाने सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी पदाधिकारी, सदस्य, आदी मान्यवर, संबंधित वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
📲Get App