🔥 ट्रेंडिंग केरल भाग्यथारा BT-73 लॉटरी परिणाम 28 स... लुधियाना में भगत सिंह जयंती पर ‘जश्न‑ए... बक्सर के नेहा नर्सिंग होम में ऑपरेशन क... MPPSC ने 1 नवंबर को 30,000 अभ्यर्थियों... लालपुर पंचायतीराज चुनाव की आचार संहिता को लेक...
28 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

यावल तालुक्यातील साकळी येथे २६ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या....!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 23 सित. 2026, 10:42 AM 👁 33
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी...

यावल, ता. २२ - यावल तालुक्यातील साकळी गावातील शनीपेठ भागात एका २६ वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

साकळी, ता. यावल येथील शनीपेठ परिसरातील रहिवासी विनोद जीवन बडगुजर उर्फ सोन्या, वय २६ याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना सोमवारी, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी निदर्शनास आली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जीवन बडगुजर यांनी दिलेल्या खबरीवरून ही नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तरुणाच्या अकाली जाण्याने साकळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
📲Get App