🔥 TRENDING बैतूल: पुलिस अधीक्षक की अध्यक्षता में... திருச்சுழி அருகே சோலார் நிறுவனத்தில் ம... भोरेश्वर मंदिरात प्रदोष निमित्त रुद्र... ಸಾಲಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ವೀರರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್... जिला कलक्टर ने जलापूर्ति योजनाओं एवं ह... Assam NEET UG Stray Round Seat Allotme...
23 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

विद्यार्थ्यांना Ideal Study App चे वाटप

✍️ Reporter: Chetan Prabhakar Sarode 🗓 23 Oct 2026, 06:22 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भाऊसाहेब बाजीराव ओंकार पाटील माध्यमिक विद्यालय तारखेडा येथे रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांना Ideal Study App चे वाटप

शैक्षणिक प्रगतीसाठी रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावचा स्तुत्य उपक्रम

तारखेडा, दि. २२ ऑक्टोबर २०२६ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावच्या वतीने भाऊसाहेब बाजीराव ओंकार पाटील माध्यमिक विद्यालय तारखेडा येथील विद्यार्थ्यांना Ideal Study App चे वाटप करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर श्री. भरत सिनकर, प्रमुख पाहुणे जेष्ठ कवी श्री. पांडुरंग कौतिक सुतार, ज्येष्ठ रोटरी सदस्य श्री. चंद्रकांत लोढाया, उपाध्यक्ष डॉ. अजय परदेशी, माजी अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, डॉ. सिद्धांत तेली आणि श्री. संजय पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाविस्कर सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी डॉ. मुकेश तेली यांनी रोटरी क्लबच्या कार्याची तसेच क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

प्रकल्प सचिव डॉ. प्रशांत सांगडे यांनी विद्यार्थ्यांना Ideal Study App ची उपयुक्तता आणि शैक्षणिक महत्त्व समजावून सांगितले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येईल, असे त्यांनी नमूद केले. श्री. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यासात सातत्य, मेहनत आणि ध्येय निश्चिती यांचे महत्त्व अधोरेखित केले.

अध्यक्षीय भाषणात श्री. पांडुरंग कौतिक सुतार यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून नियमित अभ्यास करावा, मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय साध्य करावे आणि जीवनात यशस्वी व्हावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.

या प्रसंगी श्री. पांडुरंग कौतिक सुतार यांनी स्वतः लिहिलेल्या चार कवितासंग्रहांची पुस्तके शाळेला भेट म्हणून दिली. त्यांच्या या साहित्यिक योगदानामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आणि साहित्याची प्रेरणा मिळणार आहे.

या उपक्रमासाठी श्री. पांडुरंग कौतिक सुतार आणि डॉ. प्रशांत सांगडे यांनी Ideal Study App चे संपूर्ण प्रायोजकत्व स्वीकारले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले.

रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे, सचिव डॉ. स्वप्नील पाटील आणि प्रकल्प सचिव डॉ. प्रशांत सांगडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रकल्पप्रमुख रो. निखिल बिडकर आणि रो. संजय पाटील यांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव सर यांनी केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तंत्रज्ञान, साहित्य आणि मार्गदर्शन यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

“Service Above Self — स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजसेवा!” या रोटरीच्या ब्रीदवाक्याला अनुसरून रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावने सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपला.
📲Get App