🔥 TRENDING President Murmu Condemns Tragic Boat A... BJP Urges Probe Into Viral Images Link... Surjit Bhalla’s SIR Analysis Shows 13... Jio Platforms Announces IPO: A Landmar... News18 Marathi Releases Top 18 Maharas... Maharashtra urges Election Commission...
18 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

वैशाखरे येथे भव्य सामूहिक आदिवासी भोंडाई महोत्सव; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी धरला आदिवासी गाण्यावर ठेका!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 18 Oct 2026, 11:13 AM 👁 26
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
वैशाखरे येथे भव्य सामूहिक आदिवासी भोंडाई महोत्सव; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी धरला आदिवासी गाण्यावर ठेका!
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुकार रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १८/१०/२०२६
(नीड २४ न्यूज वृत्तसेवा):
मुरबाड तालुक्यातील वैशाखरे (पारधवाडी) येथे भव्य सामूहिक आदिवासी भोंडाई महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.
या पारंपरिक महोत्सवाचा आनंद घेताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, स्थानिक आमदार किसन कथोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार आणि तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी आदिवासी बांधवांसोबत थेट आदिवासी गाण्यांच्या तालावर मनसोक्त ठेका धरला.
प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आदिवासी संस्कृतीशी समरस होऊन डान्स केल्याने कार्यक्रमातील उपस्थितांचा आणि आदिवासी बांधवांचा उत्साह द्विगुणित झाला होता. या अनोख्या सोहळ्याची आणि अधिकाऱ्यांच्या या साधेपणाची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
📲Get App