🔥 ट्रेंडिंग ಸಂವಿಧಾನ ನಮ್ಮಲ್ಲರಿಗೆ ಪ್ರಜೆಗಳಾಗಿ ಮಾಡಿದೆ.... परिवर्तन के बाद कांग्रेस ने शरद पवार प... કપાસની કિંમતમાં વધારો, ખેડૂતોને મળશે ન... महाराष्ट्र में ट्रैफिक नियमों का कड़ा प... फिट इंडिया मूवमेंट के तहत देशभर मे ं '... હવે દીવમાં જ પાસપોર્ટ સેવા મેળવવાની તક...
28 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

विमा घोटाळ्याचा संशय की पूर्वनियोजित कट? सुरत ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू; एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती!

✍️ रिपोर्टर: Rajendra Patil 🗓 28 नव. 2026, 02:12 PM 👁 26
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

🚨 जळगावच्या पाटील कुटुंबावर गुजरातमध्ये जीवघेणा हल्ला! चार जणांचा दुर्दैवी मृत्यू; १३ वर्षीय मुलीच्या धाडसामुळे प्रकरणाला नवे वळण! विमा घोटाळ्याचा संशय की पूर्वनियोजित कट? सुरत ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू; एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती!

🚨 जळगावच्या पाटील कुटुंबावर गुजरातमध्ये जीवघेणा हल्ला! चार जणांचा दुर्दैवी मृत्यू; १३ वर्षीय मुलीच्या धाडसामुळे प्रकरणाला नवे वळण!

विमा घोटाळ्याचा संशय की पूर्वनियोजित कट? सुरत ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू; एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती!

गुजरातमधील बारडोली परिसरात जळगाव जिल्ह्यातील पाटील कुटुंबासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. कामाच्या शोधात सुरत येथे गेलेल्या या कुटुंबाचा प्रवास अत्यंत दुर्दैवी ठरला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, एका १३ वर्षीय मुलीच्या धाडसामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत झाल्याचे वृत्त आहे

या घटनेत नितीन ऊर्फ भुरिया पाटील, त्यांची पत्नी कविता पाटील आणि एका मुलीसह चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

👧 १३ वर्षीय मुलीच्या धाडसामुळे प्रकरणाला वाचा!

या संपूर्ण प्रकरणात १३ वर्षीय मुलीच्या धाडसाची महत्त्वाची भूमिका असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. तिच्या धाडसामुळे घटनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कुटुंबातील १५ वर्षीय मुलगा अद्याप बेपत्ता असल्याची माहितीही या वृत्तात देण्यात आली आहे.

🚔 पोलिसांची कारवाई काय?

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे वृत्त आहे.

🙏 पाटील कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली!
📲Get App