🔥 TRENDING વડાપ્રધાન શ્રી નરેન્દ્રભાઈ મોદીના જનસે... સ્થાનિક સ્વરાજ્યની ચૂંટણીઓમાં ફરજ બજાવ... Nana Patekar Reveals Why 'Horn OK Plea... Hema Malini Shocked After Receiving Ca... Legal Analyst Medha Pushkarna Reveals... Parvathy Delves into the Humanity of U...
09 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

वेळू गावात घरासमोरील दुचाकी चोरीला; वाहन चोरांचा सुळसुळाट

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 09 Oct 2026, 01:32 PM 👁 50
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वेळू गावात घरासमोरील दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात वाहन चोरांचे प्रमाण वाढले असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

भोर तालुक्यातील वेळू गावात घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील राजेंद्र पेटकर (वय २२, रा. वेळू, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १२.४५ ते सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान वेळू गावातील त्यांच्या घरासमोर लावलेली स्प्लेंडर कंपनीची बीएस-६ मॉडेलची काळ्या रंगाची मोटारसायकल (क्र. एमएच १२ डब्ल्यूवाय ६३२३) अज्ञात व्यक्तीने चोरी करून नेली.

चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असून वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वाहन मालकाने परिसरात शोध घेतला असता दुचाकीचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यानंतर त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक
३६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई नरुटे करीत आहेत.
📲Get App