🔥 ट्रेंडिंग सुप्रीम कोर्ट ने टीएमसी नाम और प्रतीक... सुप्रीम कोर्ट ने पश्चिम बंगाल के स्पीक... सुप्रीम कोर्ट ने फॉर्म 6 रो में बदलाव... एआईएमआईएम पर फिर से विवाद, विपक्ष ने व... बिहार में बाएं दलों ने सीईसी गीयनेश कु... कांग्रेस के नेता सूरज ठाकुर ने कहा, पा...
28 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वडील जखमी अवस्थेत विव्हळत होते, मुलगी मदतीसाठी रडत होती; अखेर उपचाराआधीच प्राणज्योत मालवली...!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 28 सित. 2026, 04:20 PM 👁 20
यहाँ देखें: ▶️ YouTube 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

अमळनेर : शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावर दुचाकी कठड्याला धडकून पुलावरून खाली पडल्याने ४५ वर्षीय ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २७ रोजी सायंकाळी घडली. विजय घनश्याम भार्गव उर्फ विजू महाराज (रा. केशवनगर, अमळनेर) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय भार्गव हे आपल्या मुलीसोबत मोटरसायकल क्रमांक एमएच १९ बीई १०२९ वरून शहराकडून केशवनगर येथील घरी जात होते. प्रताप तत्त्वज्ञान केंद्राजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाचा कट लागल्याचे सांगण्यात येत असून, त्यानंतर दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. या धडकेत विजय भार्गव पुलावरून खाली पडले.

या अपघातात त्यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे अपघातानंतर ते सुमारे १० ते १५ मिनिटे जखमी अवस्थेत घटनास्थळी पडून होते. त्यांची मुलगी मदतीसाठी रडत होती, तर पुलावरून जाणारे अनेकजण हा प्रकार पाहत होते. मात्र तत्काळ मदत मिळण्यास विलंब झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, भार्गव यांच्या पत्नी घटनास्थळी पोहोचल्या. प्रताप महाविद्यालयाचे कर्मचारी प्रविण डबेलकर यांच्या मदतीने जखमी विजय भार्गव यांना रिक्षातून डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

विजय भार्गव यांच्या पश्चात पत्नी, आई व एक मुलगी असा परिवार आहे. ते प्रसिद्ध ज्योतिषकार पन्नालाल भार्गव यांचे पुतणे होत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातानंतर वेळेत मदत मिळाली असती तर कदाचित उपचाराची संधी मिळाली असती, अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. उड्डाणपुलावर अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने मदत मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
📲Get App