🔥 TRENDING જુહાપુરા વિસ્તારમાં 26 વર્ષીય અનીશ પર... Goa Urges Use of FTAs to Drive Export... પશ્ચિમ કચ્છ લોકલ ક્રાઈમ બ્રાંચ (LCB) ન... Goa Pollution Board files petition in... Delhi Traffic Police Issue Advisory Ah... Nagaland Dear Lottery Results Announce...
20 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

वडगाव डाळ येथे खवले मांजरास वनकर्मचारी आणि ग्रामस्थांनी दिले जीवदान

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 20 Oct 2026, 02:02 PM 👁 36
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
उत्रौली,ता.१९: वडगाव डाळ(ता.भोर) येथे खवले मांजर पाणी पिण्यासाठी विहिरीत गेले असता पाण्यात पडले.स्थानिक शेतकरी, वनखात्याच्या कर्मचा-यांनी विहिरीतून बाहेर काढून त्याला जीवदान दिले.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी(ता.१९) सकाळी नऊच्या सुमारास भेकरदरा परिसरात शेतकरी सागर पवार हे आपल्या रानात जनावरे चारत असताना जवळच असलेल्या विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज आला.त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता खवले मांजर पाण्यात पडल्याचे जाणवले.त्यानंतर वनरक्षक पुनम माने यांच्याशी संपर्क साधून संबंधित घटनेची माहिती दिली.

माने यांनी वरीष्ठांना कळवून ताबडतोब वनमजूर किरण बरदाडे यांना सोबत घेवून घटनास्थळी पोहोचले.त्या ठिकाणी अविनाश चव्हाण,विठ्ठल डाळ, शेखर साळुंके,विजय साळुंके,गणेश चौधरी,नवनाथ बरकाले, या ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीत उतरुन खवले मांजरास पकडले,बादलीत ठेवून वर काढले.माने आणि बरदाडे यांनी माजरांची पाहणी करुन दुखापत झाली आहे की याची खात्री करुन जवळच असलेल्या वनक्षेत्रात सोडून देण्यात आले.

सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत,वनपरिमंडळ अधिकारी रोहन इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पुनम माने,वनसेवक किरण बरदाडे, आणि ग्रामस्थांच्या सहकार्यांने खवले मांजरास अधिवासात सोडण्याची मोहीम यशस्वी केली.
📲Get App