🔥 TRENDING बलिया के ददरी मेले में बक्सर के घोड़े... Delhi LG Taranjit Singh Sandhu Visits... Yashvardhan Dalal’s IPL 2026 Auction P... खगड़िया में एस टी एफ और पुलिस के मुठभे... Haryana Targets Drug‑Free India by 202... Man Drowns After Car Falls Into Water‑...
29 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

उमरीत राजकीय भूकंपाचे संकेत; भीम आर्मीचे पदाधिकारी लवकरच करणार पक्षप्रवेश

✍️ Reporter: G. P. G. U. .7798377959 🗓 29 Nov 2026, 03:50 PM 👁 25
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भीम आर्मीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राहुल दुतुरे, तालुका माजी अध्यक्ष राजेश खंडेलोटे व आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उमरी तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, येत्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भीम आर्मी भारत एकता मिशनचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मा. राहुल भाऊ दुतुरे, भीम आर्मीचे उमरी तालुका माजी अध्यक्ष राजेश भाऊ खंडेलोटे, तसेच आझाद समाज पार्टीचे उमरी तालुका अध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या संभाव्य पक्षप्रवेशामुळे उमरी तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक राजकीय वर्तुळातून येणाऱ्या माहितीनुसार, या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते लवकरच एकाच पक्षाच्या कमान्दखाली येणार असून, या निर्णयाकडे सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या विशिष्ट पक्षात हा प्रवेश होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, उमरी तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता असल्याने या प्रवेशाकडे सर्वांचे कौतुकाने पाहिले जात आहे.
📲Get App