🔥 ट्रेंडिंग मथुरा में CIRG मेले में किसान ने जयंत... दिल्ली में होगा हेमंत सोरेन का जनसभा न... बस पीछे रोल करते समय कंडक्टर की चतुरता... भारत और अर्जेंटीना के बीच द्विपक्षीय स... आवास योजना से IGRS तक लापरवाही के आरोप... इशान किशन की दौलत जारी, न्यूजीलैंड ने...
31 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

उळे (तालुका दक्षिण सोलापूर) येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप!

✍️ रिपोर्टर: Yallappa Rayagond Ragate 🗓 30 अक्टू. 2026, 10:07 PM 👁 12
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
उळे (तालुका दक्षिण सोलापूर) येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप!
उळे / बातमीदार:
पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सर्व विरोधकांची यंत्रणा मोडून काढत महाविकास आघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयाचे जोरदार स्वागत दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे करण्यात आले. महाविकास आघाडीच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ. हर्षदा देशमुख-जाधव, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अभिजित वंजारी या तिन्ही उमेदवारांचा संघर्षमय
घवघवीत विजय झाल्याबद्दल उळे येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतिशबाजी करत आणि मिठाई वाटून फटाके फोडून प्रचंड उत्साहात विजयी जल्लोष साजरा केला.
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि सर्व यंत्रणांचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
उळे येथे करण्यात आलेल्या या जल्लोष कार्यक्रमात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दिनेश शिंदे, माजी सरपंच सुरेश डांगे, शिवसेनेचे सागर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे उपाध्यक्ष अक्षय शिंदे, सोसायटीचे चेअरमन महादेव सोनटक्के, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महादेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सीताराम जाधव, अशोक मिसाळ, शिवाजी मोहिते स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकमेकांना पेढे भरवून, महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या जयघोषाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "हा विजय म्हणजे पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीवर दाखवलेला ठाम विश्वास आहे. तिन्ही मतदारसंघांत मिळलेला हा विजय येणाऱ्या काळातील राजकीय परिवर्तनाची नांदी ठरणार आहे."
या सोहळ्यास उळे परिसरातील महाविकास आघाडीतील विविध घटकांचे प्रमुख राकेश कासार, दशरथ मंजाळ, ज्ञानेश्वर शिंदे, पिंटू रोमन, प्रमोद भुसारे, हरी सोनटक्के, महादेव शिंदे, आबा जाधव पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App