🔥 TRENDING MP CM Mohan Yadav suspends Dewas Indus... गंगापुर सिटी में अग्रवाल समाज महिला सम... कांग्रेस की मुकेशी मीणा बनीं बामनवास प... वजीरपुर के सीएचसी में आयोजित परिवार नि... करौली में बाल विवाह उन्मूलन दिवस पर वी... बिलासपुर के घोंघा बाबा मंदिर परिसर में...
27 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

उजनी वाचवा, शेतकरी वाचवा: भीमानगर चौकातून जलसंपदा कार्यालयापर्यंत मशाल मोर्चा

✍️ Reporter: रीपोर्टर दिलीप नगरे 🗓 27 Nov 2026, 09:27 PM 👁 27
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उजनी धरणाच्या संरक्षणासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मच्छीमार, शेतकरी आणि वारकरी यांनी एकत्र येऊन भीमानगर चौकातून जलसंपदा कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.

इंदापूर : उजनी धरणावर होणाऱ्या AI डेटा सेंटर विरोधात आज भिमानगर चौक येथे मच्छीमार, शेतकरी व वारकऱ्यांच्या हजारोंच्या उपस्थितीत हातात मशाली घेऊन भव्य आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाचा मोर्चा भिमानगर येथील जलसंपदा कार्यालयावर धडकला.

आज शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भिमानगर चौकातून या मशाल मोर्चाला सुरुवात झाली. उजनीचे पाणी हे शेतकऱ्यांचे जीवन आहे, ते AI डेटा सेंटरसारख्या प्रकल्पाला देऊ नये, अशी आक्रमक भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली.

हजारो शेतकरी, मच्छीमार आणि वारकरी हातात मशाल घेऊन "उजनी वाचवा - शेतकरी वाचवा", "AI डेटा सेंटर रद्द करा", "उजनीचं पाणी पळवू देणार नाही" अशा घोषणा देत रस्त्यावर उतरले होते. मशालींच्या उजेडाने संपूर्ण भिमानगर चौक परिसर उजळून निघाला होता.

उजनी धरणाच्या पाण्यावर लाखो शेतकऱ्यांची शेती, पिण्याचे पाणी आणि हजारो मच्छीमार कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. डेटा सेंटरसाठी कोट्यवधी लिटर पाणी वापरले गेले तर उजनी कोरडी पडेल आणि शेतकरी उद्ध्वस्त होईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

या आंदोलनात शेतकरी, मच्छीमार, वारकरी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
📲Get App