🔥 TRENDING મટોડા માં ઘરમાંથી કોડેઈનવાળી કફ સિરપની... गांव हारनी खुर्द में श्री अखंड पाठ साह... Kashmir Experiences Sub‑Zero Temperatu... CineInfinity publishes advance booking... Ramayana Sets Record for Lowest Single... From Quilt Worker to AICC Secretary: Y...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

धानिवली ते आळंदी पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात प्रस्थान; ४२ वर्षांची अखंड परंपरा कायम

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 26 Nov 2026, 01:26 PM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड: (जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले, ठाणे सह तालुका प्रतिनिधी किशोर पवार, मुरबाड)
दिनांक २६/११/२०२६.
वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा जपत अखिल मुरबाड तालुका परमार्थिक शेतकरी समाजाच्या वतीने यंदाही 'धानिवली ते आळंदी' पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. या पायी दिंडीचे यंदाचे हे ४२ वे वर्ष असून, मुरबाड तालुक्यातील शेतकरी आणि वारकरी बांधवांमध्ये या सोहळ्याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
गुरुवर्य स्व. विठ्ठल बाबा सरजीने यांनी ४२ वर्षांपूर्वी या पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात केली होती. आज त्यांचे शिष्य ह.भ.प. दत्तात्रय महाराज सरजीने व ह.भ.प. अर्जुन महाराज सरजीने यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. मुरबाड तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांसाठी ही दिंडी म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक बनली आहे.
धानिवली येथून टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या जयघोषात या दिंडीने आळंदीकडे प्रस्थान केले. वाटेत गावोगावी ग्रामस्थांकडून दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले जात असून, वारकऱ्यांसाठी ठीकठिकाणी अन्नदान, चहा-पाणी आणि फराळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
शेतकरी समाजाच्या वतीने चालवली जाणारी ही दिंडी केवळ एक धार्मिक सोहळा नसून, शेतकऱ्यांमध्ये एकोपा, बंधुभाव व संस्कृती जपण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. "शेतात राबणारा हात, विठ्ठलाच्या भक्तीतही तितकाच पुढे आहे," अशी भावना यावेळी सहभागी वारकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच, ४२ वर्षांची ही अखंड परंपरा पुढील पिढीनेही अशीच चालू ठेवावी, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
📲Get App