🔥 ट्रेंडिंग Global Mobile Brand Launches New Flags... US signs major LNG supply deal with EU... પોશીના પોલીસે વલસાડી ગામે કપાસની આડમાં... आज मुख्यमंत्री मिर्जापुर मे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने मीरजापुर... मल्हार स्कूल के छात्रों ने अधिकारियों...
15 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
यात्रा

धम्मभूमी देहूरोडच्या धम्मरथाचे शिरूरमध्ये उत्साहात स्वागत

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 15 अक्टू. 2026, 01:56 PM 👁 17
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सर्वे सत्ता सुखी होन्तु’ या संदेशातून सर्वांच्या सुख, शांती आणि कल्याणाची भावना

धम्मभूमी देहूरोडच्या धम्मरथाचे शिरूरमध्ये उत्साहात स्वागत

शिरूर प्रतिनिधी 15 ऑक्टोबर 2026
शिरूर शहरात गुरुवारी ‘धम्मभूमी देहूरोड’च्या आकर्षक धम्मरथाचे आगमन झाले. आकर्षक सजावट, धम्मचक्र तसेच भगवान बुद्धांच्या प्रतीकांनी सजविण्यात आलेल्या या धम्मरथाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

या धम्मरथावर ‘सर्वे सत्ता सुखी होन्तु’ हा शांतता व मानवकल्याणाचा संदेश ठळकपणे प्रदर्शित करण्यात आला होता. धम्मरथाच्या माध्यमातून भगवान बुद्धांचे धम्म, समता, बंधुता, करुणा आणि शांततेचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.

शिरूर शहरात धम्मरथाचे आगमन होताच नागरिकांनी उत्सुकतेने त्याचे दर्शन घेतले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे अध्यक्ष रामभाऊ झेंडे यांनी धम्मभूमी देहूरोडच्या धम्मरथाचे उत्साहात स्वागत केले.

यावेळी भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल मल्लाव यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत धम्मरथाचे स्वागत करण्यात आले.

धम्मरथाच्या आकर्षक सजावटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक एकोपा, समता आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले.

‘सर्वे सत्ता सुखी होन्तु’ या संदेशातून सर्वांच्या सुख, शांती आणि कल्याणाची भावना व्यक्त होत असून, धम्मरथाच्या माध्यमातून हा मानवतावादी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
📲Get App