🔥 ट्रेंडिंग Rs 180 crore approved for new Jayadeva... Mysuru Jayadeva Hospital to Build New... ਬਾਈਕ ਚੋਰੀ ਦੀ ਘਟਨਾ: ਚੋਰੀ ਕੀਤੇ ਬਾਈਕ ਦੇ ਮ... कसगंज के सुनवाई गाँव में भारी बारिश से... Karnataka Budget Allocates Rs 20 Crore... ਪਰਵਿੰਦਰ ਝੋਟਾ ਕਤਲ ਮਾਮਲੇ ''ਚ ਹੁਣ ਵਿਪਨ ਦੇ...
22 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

दुष्काळावर मात करण्यासाठी करंजी बुद्रुक ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांनी खोचापाडा नदीवर बांधले १२ बांध

✍️ रिपोर्टर: Suman Gavit 🗓 22 अक्टू. 2026, 12:26 PM 👁 17
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

खोचापाडा येथील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्त श्रमदानाद्वारे नदीवर १२ बांध बांधून भूजल पातळी वाढविण्यास मदत केली आहे. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

नवापूर : सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच परिसराiतील पाणीटंचाई कमी करून भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने करंजी बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत खोचापाडा येथून वाहणाऱ्या नदीवर गावकऱ्यांनी एकजुटीने श्रमदान करून १२ लहान-मोठे बांध बांधले आहेत. गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घेत राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून नदीपात्रात योग्य ठिकाणी हे बांध उभारण्यात आले आहेत. या बांधांमुळे नदीचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरण्यास मदत होईल. परिणामी परिसरातील भूजल पातळी वाढण्यास, विहिरी व बोअरवेलमधील पाणीसाठा टिकून राहण्यास आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. दुष्काळी परिस्थितीत केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.

या जलसंधारणाच्या कामासाठी सुरेश गावीत यांनी जेसीबी उपलब्ध करून दिला. तर कॉम्रेड आर. टी. गावीत, फिलिप गावीत, सर दिलिप गावीत, कृषीअधिकारी राहुल वी. गावीत, ओरंगाबाद जेयशिंग गावीत, नारायण गावीत, दानियेल गावीत, पंचायत समिती सदस्य आसिम गावीत (भोमदी पाडा), नारायण तात्या गावीत, आशिष बी. (साक्री) आणि अजय पंत्या गावीत यांनी उपक्रमात सहभाग घेत आर्थिक मदत केली.

तसेच फिलिप गावीत, सखाराम गावीत, जेयसिंग गावीत, रणजित गावीत, राजू गावीत, आनंद वळवी, विलास गावीत, नारायण गावीत, रामदास गावीत, दाविद गावीत, इरजी गावीत, रेगज्या गावीत, दत्तू गावीत, योहान गावीत, आशिष गावीत, प्रफुल गावीत, गोमा गावीत आणि विपुल गावीत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आणि मेहनत घेऊन या कामात योगदान दिले. जलसंधारण ही काळाची गरज असून, पावसाचे पाणी गावातच अडवून जमिनीत जिरविणे हे दुष्काळावर मात करण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. खोचापाडा येथील शेतकऱ्यांनी एकजुटीने केलेले श्रमदान हे गावाच्या विकासासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे, याचे उत्तम उदाहरण आहे.
📲Get App