🔥 TRENDING চাতরা সি.এস.সি. ক্লাবের সেরা প্রতিমা প... Tawang Welcomes Sacred Buddha Relics A... Arunachal Pradesh Government Announces... किसानों के सीजन का टाइम है अभी भी इंदि... J&K Finance Dept Promotes Senior Assis... J&K Maps 30,000 Chinar Trees in New Di...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

दुष्काळमुक्त गाव – सक्षम कुटुंब अभियान २०२६‑२७: श्रीयांश बहुउद्देशीय संस्था जालना

✍️ Reporter: Prashant Pradhan 🗓 05 Nov 2026, 11:38 PM 👁 67
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्रीयांश बहुउद्देशीय संस्थेने जालना येथे दुष्काळमुक्त गाव व सक्षम कुटुंब अभियान सुरू केले, ज्यात जलसंधारण, शेतकरी सक्षमीकरण व रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे.

दुष्काळमुक्त गाव – सक्षम कुटुंब अभियान २०२६‑२७ श्रीयांश बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जालना येथे सुरू करण्यात आले असून, ग्रामीण भागातील पाणीटंचाई व दुष्काळाच्या समस्यांवर दीर्घकालीन उपाय शोधण्याचा उद्देश आहे.

या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट पाण्याचे संवर्धन, शाश्वत शेती, पशुपालन व ग्रामीण कुटुंबांना स्वावलंबनाची दिशा देणे हे आहे. पाणी बचत, पावसाचे पाणी साठविणे, आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन व पर्यावरण संवर्धन या विषयांवर जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

युवकांसाठी कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण आणि सामूहिक प्रयत्नांना प्रोत्साहन देऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक संसाधनांचे योग्य व्यवस्थापन व शासकीय योजनांची माहिती यावर लक्ष केंद्रीत केले जाईल.

संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मा. श्री. प्रशांत अशोक प्रधान यांच्या पुढाकारातून ग्रामस्थ, शेतकरी, महिला व युवकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेऊन शासकीय यंत्रणेशी समन्वय साधून गावाच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले जातील.
📲Get App