🔥 TRENDING ધાંગધ્રા શહેર મા નવયુગ સિનેમા પાસે આવે... ఏలూరు, పి.గో జిల్లాల్లో మున్సిపల్ ఎన్న... Cyclone Arnab Hits Andhra Pradesh Coas... తణుకు మున్సిపల్ ఎన్నికలలో రాజకీయ వేడి... AI-Created Cats Go Viral, Garner 1.76... Six Family Members Killed in Dharashiv...
09 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या दारी दिवाळी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरखेड येथील लोहारी सावंगा येथे केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी

✍️ Reporter: अंकुश सुधाकरराव कापसे 🗓 09 Nov 2026, 10:20 AM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
शेतकऱ्याच्या घरी केला रात्रीचा मुक्काम
लोहारी सावंगा येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्याचे विशेष आकर्षण म्हणजे, त्यांनी प्रोटोकॉल बाजूला सारत गावातील रामभाऊ बालपांडे यासामान्य शेतकऱ्याच्या घरी साधी डिनर पार्टी केली आणि तिथेच रात्रीचा मुक्कामही केला. एका राज्याचा मुख्यमंत्री थेट एका शेतकऱ्याच्या घरी मुक्कामाला आल्याने शेतकरी कुटुंबाला मोठा भावनिक आधार मिळाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबासोबत जमिनीवर बसून जेवण केले आणि त्यांच्या शेतीविषयक अडीअडचणी, दुष्काळी परिस्थितीमुळे आलेले आर्थिक संकट व इतर समस्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली.वरुड तालुक्यातील लोणी येथील अंकुश सुधाकरराव कापसे यांनी आपल्या रिपोर्टींगच्या माध्यमातून हे वास्तव कॅमेऱ्यात कैद करून आणि शब्दांत मांडून समाजाच्या पटलावर आणले. त्यांच्या या वृत्तसंकलनाने प्रशासनाला खडबडून जागे केले.
📲Get App