🔥 TRENDING India Alliance Rally at Ram Lila Maida... India Alliance Holds Rally at Ram Lila... Voting Begins for Satara District Bank... PM Modi, Amit Shah, Rajnath Singh to S... Reliance Shares Surge Over 6% in Marke... Sensex Surges 1,000 Points in Record R...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

दुष्काळग्रस्त भागात वरुणराजांची हजेरी, बारामती‑इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी

✍️ Reporter: रीपोर्टर दिलीप नगरे 🗓 02 Nov 2026, 11:38 AM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वरुणराज यांनी दुष्काळग्रस्त भागात भेट देत बारामती‑इंदापूर तालुक्यातील मुसळधार पावसाचा आणि सखल भागातील पाण्याचा आढावा घेतला.

बारामती, ता. 2 नोव्हेंबर: पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्याला आज पहाटेपासून मुसळधार अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.

बारामती शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अवघ्या काही तासांत 158 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बारामतीचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सकाळी 7 वाजेपर्यंत ही नोंद झाल्याची माहिती दिली. एका महिन्याचा पाऊस एका रात्रीत पडल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला असला तरी शहरातील अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे.

दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बारामती आणि इंदापूर तालुक्यांनाही या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झालं आहे
बारामती शहर आणि परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बारामती-भिगवण रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
बारामती आणि इंदापूर तालुक्यातील घरांमध्ये पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्राला यलो अलर्ट दिला असून यामध्ये प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा समावेश आहे. पुणे, बारामती, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर भागात चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे.
📲Get App