🔥 ट्रेंडिंग केपिल शर्मा ने एनडीटीवी एमपी छत्तीसगढ़... करवा चौथ पर पत्नी की फांसी के बाद पति... चेतगंज पुलिस ने गुमशुदा बालिका को सुरक... କାଳିମେଳା ଆଦିବାସୀ କଲୋନୀରେ ବିଧାୟକ ପାଣ୍ଠି... राजस्थान ने डीए 3% बढ़ाकर 63% किया, जु... মা দুর্গা প্রতিমা নিরঞ্জন কে কেন্দ্র ক...
30 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सरकारी योजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हाधिकार्याल येथे आढावा बैठक

✍️ रिपोर्टर: Ashok Patil 🗓 30 अक्टू. 2026, 09:25 PM 👁 20
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हाधिकार्याल येथे आढावा बैठक

धुळे
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांना सक्तीच्या कर्जवसुलीपासून संरक्षण, खासगी सावकारांच्या छळाविरुद्ध कठोर कारवाई आणि प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा, रोजगार व अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन बँकांनी सक्तीची कर्जवसुली करू नये. बेकायदेशीर सावकारी आणि शेतकऱ्यांच्या छळवणुकीच्या तक्रारींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. तसेच पीक नुकसानीचे पंचनामे अचूकपणे पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना शासकीय मदत वेळेत मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश दिले.
आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावनिहाय कृती आराखडे तयार करणे, जलसंधारणाच्या कामांना गती देणे आणि पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला. पशुधनासाठी चारा आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच, दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सर्व विभागांनी तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले.
धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांत ४ नोव्हेंबरपूर्वी मोफत आनंदाचा शिधा व अन्नधान्याचे वाटप पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत प्रलंबित आधार प्रमाणीकरण आणि तक्रारींचा निपटारा तातडीने करण्यास सांगितले.
दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवावी, हीच अपेक्षा व्यक्त केली
📲Get App