राजनीति
ठाणे जिल्ह्यात नवमतदारांसाठी विशेष शिबिरे: ३, ४, १०, ११ ऑक्टोबरला नाव नोंदणीची संधी
यहाँ देखें:
▶️ YouTube
भारत निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निर्देशानुसार एसआयआर कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून ठाणे जिल्ह्यात ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबरला नवमतदारांना नाव नोंदविण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
दिनांक ५/१०/२०२६ ठाणे
विशेष वृत्त ठाणे :भारत निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निर्देशानुसार एसआयआर कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात नवमतदारांना नाव नोंदविण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
विशेष शिबिरे ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येतील. या शिबिरांमध्ये नवीन मतदारांना नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली जाईल व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी उपलब्ध होईल.
या उपक्रमाचा उद्देश नवीन मतदारांना मतदानाच्या यादीत समाविष्ट करून लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करणे हा आहे. नागरिकांना या शिबिरांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या मतदानाच्या हक्काचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.विशेष सखोल फेरबदल (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या दावे व हरकतींसाठीची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांनाही या कालावधीत नाव नोंदणी, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती अथवा नाव वगळण्यासाठी अर्ज करता येणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या २६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या निर्देशांनुसार एसआयआर कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२६ अशी मुदत देण्यात आली असून अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार यादी सर्वेक्षण कार्यक्रम न झाल्याने १ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनेक नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविता आले नव्हते. आता १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना या विशेष मोहिमेत नाव नोंदविता येणार आहे. तसेच गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांनाही त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून नोंदणीची संधी देण्यात आली आहे..